आपल्याला आनंदी राहायचं असेल तर
लहानपण देगा देवा
मुंगी साखरेचा रवा...
असे म्हणतात ते चुकिचे नाही आहे. खरंच लहान असताना आपण ज्याप्रमाणे खेळतो,
बागळतो , एकमेकांशी लढतो,
नाराज होतो. पण काही क्षणात परत सर्व विसरून आनंदाने राहतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला ना स्वतःला वेळ देता येत ना स्वतःच्या मुलांना वेळ देता येत. तुमचं बालपण ज्या आनंदात गेले खरंच तुम्ही तुमच्या मुलांना तसे बालपण देत आहेत
? आपण आज जे बालपण आपल्या मुलांना देत आहो ते त्यांना समोर नकोसे वाटणारे आहे. जीवनात फक्त पैस्याच्या मागे धावून आनंद आणि सुख घेता नाही येत तर पैशे कमावताना थोडा वेळ काढून आनंद कमावला तर खरंच आपला जीवन आनंदी आनंद होऊन जाईल आणि आपणाला खरे आयुष्य जगण्याचा अनुभव मिळेल.
आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते आणि जे आपल्यावर अथांग प्रेम करतात तेही. माणूस हा भावनेचा भुकेला असतो. मनुष्य आणि रोबोटमध्ये फरक फक्त भावनेचा आहे. जे लोक आपली काळजी घेतात, त्यांना आपल्या प्रत्येक गोष्टीची चिंता असते.
अशाच लोकांना वेळ आणि प्रेम दिले पाहिजे.
माणूस मृगजळामागे धावणार्याे हरणासारखा सुखाच्या मागे धावत चालला आहे. या दोघांत एक फरक आहे. हरिण हा तहान लागल्यामुळे आणि पाणी मिळत नसल्याने त्या पाण्याच्या भासामागे पळत असतो पण माणूस जवळ सुखाची साधने असूनही या सुखाच्या भासामागे पळत असतो. हरिण अज्ञानी असल्याने मृगजळामागे धावतो पण माणूस सर्वात ज्ञानी असूनही त्याला त्या सुखाच्या मृगजळामागे धावताना आपल्या जवळ सुखाची साधने आहेत याची जाणीव होत नाही.
?

Comments
Post a Comment
If you have any doubts, pls let me know.