संगणकाची माहिती (Computer Information)
संगणकाची माहिती (Computer Information)
संगणक म्हणजे काय?
संगणकाचा इतिहास
Bit -Single Binary Digit (1 or 0) Byte 8 bits
संगणकाचे फायदे आणि उपयोग
संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि
विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या
जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात
येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप
टाकुया .
१) वेग :-
कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे .
२) अथकपणा :-
आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा येवू
शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत
नाही .
३) स्वयंचलित :-
संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो .
४) तार्किक व अमृत प्रक्रिया :-
गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत
प्रक्रिया करू शकतो . कोणत्याही शास्त्रातील अमृत संकल्पना सोडवण्यासाठी संगणकाचा
फायदा होतो .
1) गणिती सूत्र किती ही अवघड असले तरी योग्य सूचना दिल्यास संगणक ते चटकन सोडवतो
त्याच त्याच प्रकारच्या गणन करण्यात संगणक तरबेज आहे .
२) संगणकामध्ये अती प्रचंड प्रमाणात माहिती संग्रहित करुण ठेवता येते ,
या संग्रहित करुण
ठेवलेल्या माहिती मधून एखादी माहिती आपल्याला पाहिजे असेल तर लगेच सगणक आपल्या
समोर ठेवतो .
३) संगणकाचा उपयोग करुण आलेख , आकृत्या , आलेख तसेच रंगीत चित्र सुलभ पणे काढता येतात .
४) कोणत्या ही क्लिष्ट सहाय्याने काढून ते वेगवेगळ्या कोनातून कसे दिसेल हे
संगणकाच्या मदतीने पाहु शकतो
5) उद्योग धंदे , व्यापार , बैंक , कॉल सेंटर , शेअर मार्केट, हॉस्पिटल , शाळा महाविद्यालय , टिकिट रिसर्वेशन
अन्य खुप क्षेत्रात उपयोग होतो .
६) भौतिक , गुंतागुंतीच्या शास्त्रात , सैन्यदलाच्या तिन्ही दलात बरीचशी भिस्त आता संगणकावर आहे .
७) रोगाचे निदान लावण्यासाठि प्रतेक्ष शास्त्र्क्रियेत अचूकता येण्यासाठी
संगणकाची मदत घेतली जाते .
८) इंजिनियरला घराचे , इमारतीचे तसेच पुलाचे डिझाईन करायचे असेल तर संगणकाच्या
मदतीने तो पुर्व् नकाशा बनवु शकतो .
९) जन्म कुंडली बघणे तसेच अन्य कामासाठी संगणकाचा उपयोग केला जातो .
प्रकार आणि काम करण्याची पद्धत :
संगणकाचे प्रकार :-
संगणकाचा शोध लागल्या पासून आज पर्यंत त्याच्या आकारात बरेच बदल होत गेले
.पूर्वी संगणक आकाराने खुप मोठा होता आता त्याचा आकर खुपच लहान झाला आहे. उदा .
डेस्कटॉप, लैपटॉप
संगणकाचे तिन प्रकार आहेत
१) अनालोग कॉम्प्युटर२) डिजीटल कॉम्प्युटर
३) हाइब्रिड कॉम्प्युटर
डिजीटल कॉम्प्युटर सध्या प्रामुख्याने सर्व ठिकाणी वापरले जात आहे .डिजीटल
संगणकाचा वेग सुरवातीला खुप कमी होता . आता त्याचा वेग खुप प्रमाणात वाढला आहे .
सध्या बाजारात 3 Ghz या पेक्षा जास्त वेगाने चालणारे संगणक बाजारात उपलब्ध झाले आहेत . हाइब्रिड
कॉम्प्युटर दोन गोष्टी मधले साम्य दाखवण्यासाठी वापरले जाते . इंटेल कंपनीने (Intel
Company) पेंटियम
(Pentium ) या नावाचा संगणक बाजारात आणला . नंतर त्यात बदल होत गेले . पेंटियम -१ ,
पेंटियम -२ ,
पेंटियम -३,
पेंटियम -४ अशा
नावाच्या कॉम्प्युटर ची त्यानी निर्मिती केली . सध्या सर्वत्र उपयोगात असलेल्या
पेंटियम -४ मध्ये वेग वेगले बदल झाल्या मुळे कॉम्प्युटर चा आकर लहान होत गेला .
घडी करुण ठेवण्या सारखे , आकाराने छोटे अशा सिस्टिम मध्ये इलेक्ट्रानिक्स घटक ,
निवडक सेकंडरी
स्टोरेज उपकरणे आणि इनपुट उपकरणे इन्बुल्ट असतात या सिस्टिम च्या बाहेर बिजगारिने
मॉनिटर जोडलेला असतो अशा नोटबुक सिस्टिम ला लैपटॉप असे म्हणतात . संगणक आकाराने
लहान झाल्या मुळे तो लैपटॉप स्वरूपात आला आणि तो कुठे ही घेवून जाणे शक्य झाले .
लैपटॉप बैटरी वर चालत असल्याने तो वापरने सर्वाना सुलभ ठरले . ज्या प्रमाने मोबाइल
चार्जिंग करावा लागतो तसा लैपटॉप ही चार्ज करावा लागतो .
सुपर कोंम्प्यूटर :-
हा सर्वात शक्तिशाली संगणका मधील प्रकार आहे . हा संगणक विशिष्ठ मोठ्या सस्थे
मध्ये वापरला जातो . उदा . अवकाश शोध मोहिम वर कण्ट्रोल ठेवण्यासाठी नासा ही सस्था
या प्रकारच्या संगणकाचा वापर करते .
मेनफ्रेम संगणक :-
हा वातानुकूलक जागेत वापरला जातो. डाटा सग्रहित करण्यासाठी ह्या प्रकारच्या
संगणकाचा वापर केला जातो . उदा . विमा कंपनी
काम करण्याची पद्धत :-
संगणकाला एखादे काम करण्यासाठी ३ प्रक्रियेतून जावे लागते.
१) इनपुट डिवाइस (Input Divice)
2) सी . पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit)
3) आउट पुट डिवाइस (Output Divice)
डिवाइस (Input Divice) :-
सी .पी . यु . सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (Central Processing Unit) :-
संगणकाच्या रचने मधील सर्वात महत्वाचा भाग याला विभागाला संगणकाचा मेंदू ही
म्हणतात . सी. पी. यु. सम्पूर्ण लहान इलेक्ट्रानिक्स भागानी बनलेला आहे . सध्या
वापरण्यात येणार्या पी -४ मधे ४२ कोटि ट्रांजिस्टर बसवलेले आहेत . सी . पी . यु .
ला ही दोन भाग असतात .
अ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट ब) कंट्रोल
अ) अर्थिमटिक लॉजिक यूनिट :-
हा विभाग संगणकाच्या महत्वाचा घटक आहे .याच्या
नावा वरुनच कळते की या विभागात गणिती आणि तर्क याच्या विषयावरील माहिती तपासली
जाते , त्यावर
प्रक्रिया होते . बेरीज , वजाबाकी , गुणाकार, भागाकार, अशा सर्व गणिती क्रिया या विभागात केल्या जातात . तसेच
एखाद्या संख्येची तुलना देखील दोन संख्ये मधून काढले जातात .
ब) कंट्रोल यूनिट :-
संगणकामध्ये होणार्या सर्व क्रियेवर लक्ष ठेवण्याचे काम
कंट्रोल विभाग करते. ज्या प्रमाणे मानवी शरीरात मेंदू माणसावर कंट्रोल ठेवते त्याच
प्रमाने कंट्रोल यूनिट संगणकाच्या सर्व हालचालीवर लक्ष ठेवते .
इनपुट विभाग कोणते ही काम करण्यासाठी सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कड़े पाठवतो
म्हणुन याला संगणकाचे प्रोसेसिंग यूनिट (Processing Unit) असे म्हणतात .
आउट पुट विभाग :-
इनपुट विभागाने दिलेली माहिती सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट कडून प्रक्रिया होवून
आउटपुट विभागाकडे पाठवली जाते . म्हणुन याला कॉम्प्युटरचे आउट पुट विभाग असे
म्हणतात . उदा :- मॉनिटर , प्रिंटर
हार्डवेयर, सॉफ्टवेर म्हणजे काय?
हार्डवेयर (Hardware) म्हणजे
ईलेक्टोनिक्स भागानी जोडून केलेले संगणक होय . उदा .
मॉनिटर , की-बोर्ड
, हार्ड
डिस्क , मदर
बोर्ड , कैबिनेट
, माउस ,
सी डी रोम ,
आदि
.सॉफ्टवेर (Software) म्हणजे
संपूर्ण संगणकाचे चलन वळण ज्या प्रकारच्या सॉफ्टवेर कडून नियंत्रित होत असते ते सॉफ्टवेर . ऑपरेटिंग सिस्टम्स (OS) हे संपूर्ण संगणक कार्यरत करणारा एक प्रोग्राम आहे . संगणकाचे हार्डवेयर व सॉफ्टवेर शिवाय कुठलाच संगणक सुरु होत नाही . संगणक आणि त्यावर काम करणार्या व्यक्ति मधील सुस्वाद सॉफ्टवेर मुळेंच होतो .
की-बोर्ड (Keyboard):-
की-बोर्ड हे संगणकाचे इनपुट डिवाइस आहे . की-बोर्ड च्या सहाय्याने आपणास संगणकाशी सव्वाद साधणे शक्य होते. संगणकाला माहिती देण्यासाठी किवा विशिष्ठ सूचना देण्यासाठी की-बोर्ड चा वापर होतो . की-बोर्ड सामान्यत टाइप रायटर सारखा असतो . जशी की आपण की-बोर्ड वर टाइप करतो तशीच अक्षरे स्क्रीन वर येतात . की-बोर्ड मध्ये काही बटन विशिष्ठ चिन्ह काढण्यासाठी असतात .
की बोर्ड चे साधारण खालील चार भाग पडतात .
१) फक्शनल की पेड़ २) अल्फा न्युमरिकल की पेड़ ३) न्युमरिकल की पेड़ ४) कर्सर
की पेड़
१) फक्शनल की पेड़ :-
या मध्ये F1 ते F2 अशा फक्शनल कीज असतात . ह्या सर्व विशिष्ट कामा
साठीच वापरतात .
२) अल्फा न्युमरिकल की पेड़ :-
या मध्ये A ते Z ही इंग्लिश मुळक्षरे असतात .
एकूण २६ आणि ० ते ९ असे अंक असतात .
३) न्युमरिकल की पेड़ :-
यात ० ते ९ असे अंक असतात आणि काही विशिष्ठ कीज काही
विशिष्ठ कामा साठीच वापरतात .
४) कर्सर की पेड़ :-
लेफ्ट, राइट, डाउन , अप ह्या जागेवर जायचे असल्यास ह्या कीज चा उपयोग केला जातो
.
की बोर्ड वर कमीत कमी ८३ तर १२७ बटन असतात . सर्व साधारण की बोर्ड वर ११० कीज
असतात . ज्या की बोर्ड वर ११० कीज पेक्षा जास्त कीज असतात त्याला मल्टीमीडिया
की-बोर्ड म्हणतात .
की-बोर्ड CPU च्या मागील भागाला जोडले असते . की-बोर्ड नोर्मल, पीस/२ , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये
उपलब्ध आहेत .
विन्डोज़ XP मध्ये स्टार्ट मेनू वर क्लिक करून Run या आप्शन वर OSK टाइप करून ENTER बटन दाबल्या नतर एका
विंडोवर एक कीबोर्ड येइल यावर माउस ने क्लिक केल्यास तेच के टाइप होतील ज्यावर आपण
क्लिक करू .असा कीबोर्ड ज्या वेळेस आपला कीबोर्ड चालत नसेल काही कही कीज काम करत
नसतील तेव्हा ऑन स्क्रीन कीबोर्ड कामाला येतो.
माउस (Mouse) :-
माउसचे ३ प्रकार आहेत.
मेंकेनिकल माउस :-
माउसचा हा सुरवातीचा प्रकार म्हणजेच ह्याच्या खालच्या भागाला एक लहानशी गोटी
च्या आकाराचा बॉल असतो जो माउस सोबत फिरत असतो त्याची वायर CPU ला जोडली असत.
ओप्टिकल माउस :- ह्या माउस ला खालच्या भागाला गोटी नसते . माउस च्या बाहेर
पडणारा प्रकाश माउसच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो .
कॉर्डलेस माउस :-
अशा प्रकारचा माउस हा बटरी वर चालतो . CPU सोबत वायरलेस द्वारे चालतो . आशा
माउस ला वायरलेस माउस देखिल म्हणतात .
माउस साधारण खालील प्रकारच्या क्रिया करतो .
१) क्लिक :- माउस चे डावे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला
क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ट क्लिक करून आपण निवडू शकतो .
२) डबल क्लिक :- डावे बटन लागोपाठ दोनदा प्रेस करून सोडणे म्हणजे डबल क्लिक
होय . एखादा प्रोग्रम्म , फाइल ओपन उघडण्यासाठी माउस मध्ये डबल क्लिक चा उपयोग करतात
.
३) राईट क्लिक :- माउस चे उजवे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या
क्रियेला राईट क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ठी संदर्भातील सुचानांची यादी आपण
पाहू शकतो स्क्रीन वर .
मदर बोर्ड (Motherboard :
मदर बोर्ड (Motherboard) हे संगणकाचे ह्रदय आहे . याला सिस्टमचा मेनबोर्ड असे ही
म्हणतात. संगणका मधले सर्व डिव्हाईस एकत्र आणण्याचे काम मदर बोर्ड करतो. मदर बोर्ड
वरील कॉम्पोनेन्ट आपला संगणकाचा प्रकार त्याची कार्यक्षमता , मर्यादा ठरवतो मदरबोर्ड
को - प्रोसेसर , बायोस , मेमरी तसेच अनेक स्लोट असतात. मदर बोर्डसर्व कार्ड ला सपोर्ट करतो उदा. टीवी
टुनेरकार्ड , साउंडकार्ड , डिस्प्ले कार्ड .
मदर बोर्ड विकत घेताना जास्तीत जास्त प्रकारच्या इंटरफेस आणि स्टैण्डर्ड
कंट्रोल्स असलेला घेण चागले असते. मदर बोर्ड मध्ये मेमरी चिप्स स्पेशल वेगळा सेट
असतो जो मेमरी पेक्षा वेगळा असतो व प्रोग्राम सुरु होण्यासाठी उपयोगी पडतो या
अतिरिक्त मेमरीला बोंयस् असे म्हणतात.
मदर बोर्ड हा CPU मध्ये जोडलेला असतो त्याला SMPS च्या सहाय्याने व्होल्टेज दिले जाते याच मदर
बोर्डवरुन प्रोसेसर ही जोडलेला असतो . ATX आणि AT असे दोन भाग या मदर बोर्डचे आहेत ATX मदर बोर्ड सध्याच्या
कॉम्प्युटर मध्ये वापरले जातात
प्रोसेसर (Processor):
को -प्रोसेसर :-
गणित किवा अवघड अशी उदा. सोडवण्यास को प्रोसेसर मुळे मदत होते सध्याच्या
मायक्रो प्रोसेसर मध्ये बिल्ट इन मायक्रो को प्रोसेसर आहेत .
मेमरी (Memory):
१) रंण्डम एक्सेस मेमोरी (Random Access Memory) :-
RAM साधारण डाटा स्टोर करण्यासाठी उपयोगी येते . Ram ही Volatile आहे या मुळे पीसी बंद
केला की डाटा नष्ट होवून जातो . RAM चे ही २ प्रकार आहेत .१) Static Ram २) Dynamic Ram
Static Ram ला
एकादी माहिती भेटली की ती पीसी जोपर्यंत बंद होत नाहीं तो पर्यंत तशीच राहते .
याला ३० किवा ७२ पिंस असतात . Dynamic Ram ला डाटा Maintain करण्यासाठी Constant रेफ्रेशिंग लागते आणि हे
अतिशय जलदगतीने होते . याला १६८ पिन्स असतात आणि ही RAM Statics Ram पेक्षा स्वस्त मिलते .
२) रीड ओनली मेमोरी (Read Only Memory) :-
नावामध्ये सांगीतल्या प्रमाणे ही मेमरी फ़क्त वाचण्यासाठी होतो.यात माहिती
पुसता किवा बदलता येत नाही. कॉम्प्युटर सुरु केला की बूट स्टार्ट अप मध्ये ही
मेमरी वाचली जाते. पीसी बंद असला तरी ही माहिती डाटा पुसला किवा नष्ट होत नाही .
डीडीआर रंम (DDR RAM) :-
आलिकड़च्या काळात ह्या DDR RAM खुप नावाजल्या आहेत . याच कारण
अस की ह्या मेमरिचा स्पीड बाकीच्या मेमरी पेक्षा डबल असतो आणि त्या कमी ही त्याच
स्पीड ने करतात . SD Ram पेक्षा ह्या प्रकारच्या RAM दुप्पट डाटा ट्रान्सफर करतात
शिवाय ह्या स्वस्त ही आहेत बाकीच्या मेमरी पेक्षा ह्यांचा स्पीड DDR 266Mhz
च्या पेक्षा जास्त
आहे.
हार्ड डिस्क (Hard Disk) :
हार्ड डिस्क संगणकाच्या CPU मध्ये बसवलेली असते . ती फ्लोपी प्रमाणे सहजरित्या बाहेर
काढली जात नाही . हार्ड डिस्क पेटि प्रमाणे असते . याच पेटी मध्ये ३ ते ८ डिस्क
एकावर एक अशा रचलेल्या असतात . या पैकी प्रतेक ट्रैक्स व सेक्टर असतात प्रतेक
डिस्कला रीड राइट हेड असतात .
पूर्वीच्या हार्ड डिस्क च्या आकाराने हल्लीच्या हार्ड डिस्क अतिशय लहान आकारात
उपलब्ध झाल्या आहेत . हार्ड डिस्क मध्ये माहित फ्लोपी डिस्क पेक्षा किती तरी जास्त
पटीने साटवता येते .
आता बाजारात 20Mb पासून ते 80Gb पेक्षा जास्त आकारात उपलब्ध आहेत . संगणका मध्ये जी माहित साठवली जाते ती
म्हणजे हार्ड डिस्क मध्ये . हार्ड डिस्क हा एलेक्ट्रोनिस्क भाग आहे या मुळे तो कधी
ही ख़राब होवू शकतो बिघडू शकतो . म्हणुन हार्ड डिस्क वरील डाटा ची माहिती दुसया
हार्ड डिस्क वर अथवा CD वर Backup म्हणुन घेतली जावू शकते . शिवाय डाटा लॉस झाला तरी तो
रिकोवर करता येतो .
आता बाजारात साटा हार्ड डिस्क आल्या आहेत ह्या नोर्मल हार्ड डिस्क पेक्षा
जास्त वेगाने डाटा ट्रान्सफर करतात आणि त्यांची डाटा साठवून ठेवण्याची क्षमता
जास्त आहे 300Gb पेक्षा जास्त क्षमता असणारी हार्ड डिस्क अतिशय अल्प दरात मिळते.
फ्लोपी डिस्क ड्राइव (Floppy Drive)
सीडी रोम/ राईटर :
ATX SMPS सध्या बाजारात उपलब्ध आहेत . आणि तेच जास्त वापरात आहेत . एसी व्होल्टेज
कनवर्ट करून मदर बोर्ड आणि अन्य उपकरणाला सप्लाई देतो . SMPS एक बॉक्स सारखा असतो . SMPS
चे वजन हलके आणि
आकाराने लहान असते . त्यात एक फंखा लावलेला असतो जेन्हे करून SMPS जास्त गरम होवू नये . SMPS
मधून हार्ड डिस्क ,
सीडी रोम ,
फ्लोपी ड्राइव ,
आणि मदर बोर्ड ला
सप्लाई देतो . एस.म.पी.एस. एक fuse असतो व्होल्टेज जास्त जाले की तो डैमेज होतो . त्या मुळे System
ला एफ्फेक्ट्स होत
नहीं. लैपटॉप मध्ये ही एसी एडाप्टर असते जे system च्या बाहेर असते . नोट बुक ची
ब्याटरी या मुळे २ ते ३ तास विज पुरवठा साठवूण ठेवतो .
मॉनिटरचा आकार :
मॉनिटरचा आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजेच स्क्रीनच्या कर्नाच्या लांबी मध्ये केले जाते . सामान्यत बाजारात १५" , १७" , १९", २१" अश्या स्वरुपाचे मॉनिटर उपलब्ध आहेत . फ्लाट्स स्क्रीन चे मॉनिटर हल्ली जास्त प्रमाणात विकले जातात . जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत जास्त असते .
इलेक्ट्रानिक्स क्षेत्रातील प्रगती मुळे विविध प्रकारचे मॉनिटर उपलब्ध झाले
आहेत . मॉनिटर आकाराच्या आणि तंत्राच्या बाबती मध्ये टेलीविजन सारखेच असतात .
मॉनिटर हे कैथोड रे ट्यूब पासून बनले आहेत म्हणुन त्याना CRT ( कैथोड रे ट्यूब ) असे
म्हणतात .
पाहिले मॉनिटर हे एक रंगी असायचे त्याला मोनोक्रोम म्हणजे ब्लैक एंड व्हाइट
मॉनिटर असे म्हणतात . सध्या रंगीत म्हणजेच कलर मॉनिटर वापरले जातात . ब्लैक एंड
व्हाइट मॉनिटर मध्ये ब्लैक,व्हाइट, केशरी, हिरवा किवा करडा रंग वापरला जातो . तर रंगीत मॉनिटर मध्ये
लाल , हिरवा
, निळ्या
रंगाचा वापर केला जातो .
मॉनिटर रेझोलुशन:-
मोनिटर वर दिसणार्या चित्रांचा दर्जा मॉनिटरच्या रेझोलुशन वर अवलंबून असतो .
मॉनिटर वर आपण जी अक्षरे , अंक , चित्र पाहतो ते लहान ठिपक्यानी बनाले असते. या ठिपक्याना
पिक्सॅल असे म्हणतात . मॉनिटर वर उभ्या आणि आडव्या ओळित मांडलेले असतात . दर एकक
क्षेत्र फळात जेवढे जास्त पिक्सॅल तेवढे चित्र अधिक क्लेअर मॉनिटर वर दिसते
.मॉनिटर वर दिसणारे रंग हे मदर बोर्ड वर लावलेल्या कलर ग्राफिक्स कार्ड वर अवलंबून
असते . सध्या VGA आणि SVGA कार्ड उपलब्ध आहेत . सुपर व्हीडीओ ग्राफिक्स अडाप्टर आणि विडियो ग्राफिक्स
अडाप्टर . सुपर सुपर विडियो ग्राफिक्स अडाप्टर मध्ये ४० लाख रंग छठा पडद्यावर
दिसतात . या मध्ये पिक्सॅल जवळ असल्याने १०२४ ओळि आणि प्रतेक लाइन मध्ये १२८०
पिक्सॅल असतात . पिक्सॅलची सख्या वाढली का आकारमान कमी होते . आणि चित्र अधिक
स्पष्ट म्हणजेच क्लेअर दिसते हल्लीच्या मॉनिटरमध्ये टीवी टूनेरकार्ड रेडी मेट
बसवलेले असते या मुळे केबल डायरेक्ट आपणास मॉनिटरवर पहायला मीळते. मॉनिटर वर
खालच्या बाजूला बटन असतात ह्या बटनाने मॉनिटरचा स्क्रीन वरचा आकार कमी जास्त करता
येतो . कंट्रास्ट व Brightness या मुळे वाढवता आणि कमी करता येतो . शिवाय मॉनिटर बंद किवा
चालू करण्याचे बटन देखिल इथेच असते .
प्रिंटर :
प्रिंटर चे सध्या ३ भाग प्रचलित आहेत .
1) डॉट मेट्रिक्स प्रिंटर :-
ह्या प्रिंटर मधील अक्षरे अनेक टिम्बाच्या स्वरूपात छापली जातात. गोल बारीक़
पिन्सची एक किवा दोन लाइनची मालीका असते . प्रतेक पिन स्वतन्त्र पणे शाईच्या
रिबिन्वर आघात करते . त्या मुळे रिबिन्वारिल शाईचा ठपका कागदावर उमटतो .
संगणकाच्या संदेशा प्रमाने पिन्स रिबिन वर जलद गतीने आघात करतात त्या मुळे कागदावर
टीबाच्या स्वरूपात अक्षरे उमटतात .
डॉट मेट्रिक्स प्रिंटर हे कमी खर्चाचे असतात . पण प्रिंटिंगच्या वेळी खुप मोठा
आवाज करत प्रिंटिंग करतात . बँकेच्या ठिकाणी अशाच प्रकारचे प्रिंटर वापरले जातात
२) इंक जेट प्रिंटर :-
हे प्रिंटर शाईच्या तुषार जल्द गतीने फवार्य सारखे उडतात .इंकच्या तुषार
सूक्ष्म छिद्रांच्या नॉझल्सने कागदावर उडवले जातात .यात नोझल्सच्या मदतीने योग्य
प्रमाणात चार प्राथमिक रंग मिसळुन रंगित प्रिंट करता येते .
३) लेझर प्रिंटर :-
हे प्रिंटर छापाईसाठी लेझर किरणांचा वापर करतात. संगणका कडून येणार्या माहिती
नुसार हे लेझर किरण सतत गोल फिरणारया ड्रमवर पडली जाते . या लेझर किरण मुळे ड्रमवर
स्थिर विद्युत प्रभाराचे ठिपके तयार होतात . ड्रमच्या लगत असलेली कोरडी शाईची भुकटी
(टोनर) ड्रम वरील विद्युत् प्रभारित कागदावर मचकुराच्या ओळी किवा चित्राचे भाग
तयार होतात .
सध्या ओल इन वन (All In One ) प्रिंटरला जास्त मागणी आहे कारण हयात सर्व प्रकारचे Function आहेत . झेरोक्स , स्कैनर , प्रिंटर , फैक्स अशा सर्व गोष्टी एकात मिळतात ह्या मुळे अशा प्रिंटरला जास्त डिमांड आहे .
संगणकाचे नेटवर्क :
संगणकाचे नेटवर्क च्यामुले आपलस खलील फायदे होतात .
१) शरिंग ऑफ़ डाटा :-
एका पेक्षाजास्त संगणका ची माहिती शेयर करता येते , यामुळे ऑफिस मधील एखाद्या डिपार्टमेटल मधील माहिती जशाच तसे एखाद्या लाब अतरावरील संगणका वर घेण किवा पाहणे शक्य होते,पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचत होते.
2) शरिंग ऑफ़ डीव्हाईस:-
एका पेक्षा जास्त संगणकाला एखादे डीव्हाईस शेयर करणे शक्य होते. उदा.प्रिंटर,स्कैनर
३) Communication :-
एकाच वेळे मध्ये अनेक संगणकाच्या बरोबर संदेश देवान घेवाण करण शक्य होते.
प्रतेक ऑफिस मध्ये १ तरी सर्वर असतो .इन्टरनेट एक्सेस करण्यासाठी ही प्रॉक्सी
सर्वर असतो ज्याला आईपी एड्रेस दिला जातो . तो आईपी एड्रेस टकला की ज्यात आईपी
एड्रेस टाकला आहे त्या पीसी मध्ये इन्टरनेट सुरु होते . ह्या मध्ये URL ही देता येते जेन्हे
करुण इन्टरनेट एक्सेस होते . नेटवर्क मुळे जरी डाटा एक्सेस करण सोप झाल असले तरी
ह्याच्या अनेक प्रोब्लेम्स ही आहेत . एक म्हणजे वाइरस प्रॉब्लम . वाइरस म्हणजे exe
फाइल ह्या फाइल
मुळे डाटा लॉस होत जरी नसला तरी वाइरस पीसी च्या System फाइल डिलीट करतो ह्या मुळे पीसी
ला प्रॉब्लम होतो .
नेटवर्क मुळे डाटा सफे रहत नाही कुणाचा ही डाटा कुणी बघू शकतो . जर शेरिंग
काढली तर डाटा कुणीही एक्सेस करू शकत नाही. नेटवर्क ला विशिष्ट कोड किवा पासवर्ड
देण खुप गरजेच असत . करण जर नेटवर्क जर ओपन राहिले तर कुणीही ते एक्सेस करू शकते
त्याचा दूर उपयोग होवू शकतो . किवा नेटवर्क हैक होवू शकते . हल्ली अतेरिकी ह्याचा
फायदा घेवून दुसर्याच्या नेटवर्क हैक करुण ईमेल पाठवतात .वायरलेस नेटवर्क ज्या
ठिकाणी असते त्या ठिकाणी केबल ची गरज लगत नाही . वायरलेस मार्फ़त पीसी नेटवर्क
मध्ये सेटिंग करून जोड़ता येतो . नेटवर्क मुळे सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजे
ऑफिस मध्ये नेटवर्क प्रिंटरचा एकाच प्रिंटर मध्ये नेटवर्क मध्ये जोडलेल्या पीसी
मधून प्रिंट देण शक्य झाल यामुळे प्रिंटरचा खर्च ही वाचतो शिवाय जागा ही वाचते
नेटवर्कची जोड़णी राउटर , हब , स्विच, सेटलाईट किवा मोडेमला जोडून नेट्वर्किंग केले जाते जाते . CAT
5 केबल , ऑप्टिक फाइबर केबल
द्वारे नेट्वर्किंग केले जाते .
नेटवर्क चे वर्गीकरण नेटवर्कचा आकार आणि रचना यांच्या आधारे केला जातो यावरून नेटवर्क चे ३ प्रकार पडतात .
१) लोकल एरिया नेटवर्क (LAN) :-
एकाच इमारती मधील किवा विभागातील संगणक एकमेकाना जोडले जातात त्याला लोकल
एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये संगणक एकमेकाशी एकाच प्रकारच्या
केबलने जोडलेले असतात . नेटवर्क मध्ये संगणकाची जोड़णी कमी असते . नेट वर्क च्या
बाकीचा प्रकारा पेक्षा हे नेटवर्क स्वस्त असते LAN मध्ये LAN कार्ड आणि केबल आवशक असते. LAN
१० किलो मीटर च्या
कमी अंतरा साठी वापरले जाते .
२) मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क (MAN) :-
हे नेटवर्क LAN पेक्षा मोठे असते . मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क पूर्ण सिटी शहरात जोडले जाते .
या नेटवर्क मध्ये वेगवेगळ्या केबलचा वापर केला जातो. एखाद्या मोबाइल कंपनीचे
एखाद्या सिटी मधील वेगवेगळ्या भागात ह्या मुळे शक्य होते. टेलेफोन किवा रेडियो चे
नेटवर्क म्हणजे MAN नेटवर्क होय .
3)वाइड एरिया नेटवर्क (WAN) :-
जेव्हा दोन शहरातील नेटवर्क एकमेकाना जोडले जाते त्या
नेटवर्कला वाइड एरिया नेटवर्क असे म्हणतात . या नेटवर्क मध्ये टेलेफोन लाइनचा किवा
उपग्रहाच्या मार्फ़त सेटलाईट द्वारे जोडले जातात .
मोडेम :
याच्या उलट एनोलोग सिग्नलचे रूपांतर डिजीटल सिग्नल मध्ये केला जातो तय रूपांतर
करणारया क्रियेला डीमोडूलेशन असे म्हणतात. ही क्रिया मोडेम हे करते . मोडेमचे दोन
प्रकार पडतात . बाह्य मोडेम आणि अंतगर्त मोडेम
१) बाह्य मोडेम (External) :-
जेव्हा मोडेम संगणकाला बाहेरून जोडले जाते . तेव्हा त्याला
बाह्य मोडेम असे म्हणतात . एका बाजूने मोडेम संगणकाला जोडला असतो दुसर्या बाजूने
मोडेम टेलेफोन लाइनला जोडला असतो .
2) अंतगर्त मोडेम (Internal) :-
जेव्हा मोडेम संगणकाच्या CPU मध्ये मदर बोर्डला जोडले जाते .
तेव्हा त्याला अंतगर्त मोडेम असे म्हणतात . फ़क्त मोडेमला टेलेफोने लाइन जोडली असते
.
मोडेम चा उपयोग प्रामुख्याने इंटरनेट करता केला जातो. मोडेम मधून डाटा
मोजन्यासाठी एकक बीट्स पर सेकंड (bps) या परिमाण घेतले जाते. हल्लिचे मोडेम ५६ kbps
स्पीड चे आहेत .
लैपटॉप मध्ये इन्टरनेटसाठी मोबाइल कंपनीचे डाटा कार्ड उपलब्ध झाले आहेत . टाटा
, रिलायंस ,
तशेच अन्य डाटा
कार्ड उपलब्ध जाले आहेत .
वेब कैमरा + पेन ड्राइव :
वेब कैमरा
पेन ड्राइव :-
स्कैनर + स्पीकर :
स्कैनर :-
स्कैन केलेली माहिती आणि तीची प्रतिमा सिस्टिम युनिट मध्ये प्रक्रिया करू शकेल अशा भाषेत रूपांतरित करण्याच काम स्कैनर करते . स्कैनिंग उपकरणे ३ प्रकारची आहते ओप्टिकल स्कैनर , बार कोड स्कैनर आणि अक्षरे व चिन्हे ओळखणारी उपकरणे .
ओप्टिकल स्कैनर :-
याना नुसते स्कैनर असे म्हणतात .माहिती आणि इमेज म्हणजेच
प्रतिमा सिस्टिमला वाचता येइल अशा स्वरूपात स्कैन म्हणजे प्रक्रिया करून देतात .
ओप्टिकल स्कैनर ला अक्षरे किवा प्रतिमा समजत नाहीत तर अक्षरे आणि प्रतिमा तयार
करण्यासाठी प्रकाश , अंधार आणि रग बेरंगी आकर मात्र स्कैनर ला समजतात . स्कैन केलेली माहिती फाइल
रुपात संगणका मध्ये साठवली जाते . ती वाचता अथवा प्रिंट ही करता येते . ओप्टिकल
स्कैनर चे ही २ प्रकार आहेत
१) फ्लैटबेड स्कैनर :-
हयात एखाद्या पेज च्या प्रति बनवण्या साठी स्कैनर च्या
काचेवर ते पेज ठेवले जाते तो ते स्कैन करतो.
२) पोर्टेबल स्कैनर :-
हे हातात धरून स्कैन करण्याचे उपकरण आहे ,
बार कोड स्कैनर रीडर :-
आपण मोठ्या दुकानात किवा शोपिंग मोंल मध्ये अशा
प्रकारचे स्कैनर पाहिले असेल अशा प्रकारचे स्कैनर हातात धरून स्कैन केले जाते.
काही रीडर विशिष्ट जागी बसवले जाते
त्यानां फ्लैट फॉर्म रीडर असे म्हणतात . त्यात स्कैन केलेले कोड संगणका मध्ये
पाठवले जाते त्यात वजन , कीमत आणि वस्तूची उपलब्धी ह्या सर्व माहिती साठवल्या जातात.
स्कैनर माहितीची पड़ताळणी करून वस्तूची ताजी माहिती इलेक्टिकल कैश रजिस्टर्ला देतो
. हयात वास्तुच्या किमतीचा तपशील ही असतो .
अक्षरे आणि चिन्हे ओळखणारी स्कैनर :- अशा स्वरुपाची स्कैनर अक्षरे आणि चिन्हे
ओळखण्यासाठी येतात . विशिष्ट उद्देश साठी अशी स्कैनर वापरली जातात . बैंक मध्ये
चेक वर ची अक्षरे ओळखण्यासाठी तसेच पेन्सिल ने केलेली खून ही अनेक पर्याय मधून
निवडली आहे का नाही त्या नुसार गुण मोजणी साठी हे उपयोगी पडतात ह्या मध्ये ३
प्रकार आहेत . MICR , OCR, OMR.
ऑपरेटिंग सिस्टम (OS)
ऑपरेटिंग सिस्टम हा सॉफ्टवेर चा महत्वाचा भाग आहे . आपल्या कड़े ज़र वर्ड ,
एक्सेल , ऑटोकाड, फोटोशॉप, टेल्ली या सारखे पकेज
असले तरी ऑपरेटिंग सिस्टम शिवाय हे पेकजे आपण वापरू शकत नाही. ऑपरेटिंग सिस्टम
मध्ये आपले कड़े विन्डोज़ नावाची ऑपरेटिंग सिस्टम लोकप्रिय आहे . सध्या ह्या
ऑपरेटिंग सिस्टम चे भाग विन2000, विनXP, विन विस्टा,विन 7 ह्या लोकप्रिय आहेत . जास्त वापरत आहेत .
विन्डोज़ XP साठी लागणारे आवशक कॉन्फिगुरेशन :
सॉफ्टवेर (Software) :
सॉफ्टवेर म्हणजे संगणकावर वापरला जाणारा प्रोग्राम होय . या प्रोग्राम द्वारे
विशिष्ट कमांड देवूण तसेच विशिष्ट माहिती देवून आपणास हवे ते आउट पुट मिळवता येते
. सॉफ्टवेर ही काँम्प्यूटर वापरताना लागणारी आवशक गोष्ट आहे . संगणकाच्या
हार्डवेयर डिवाइस ला आपण ज्या वेग वेगळ्या कमांड आणि सुचना देतो . त्या कमांड आणि
सूचना देण्यासाठी काही विशिष्ट प्रोग्राम्स ची गरज असते . या प्रोग्राम्स ला
संगणकाचे सॉफ्टवेर असे म्हणतात .
सॉफ्टवेर चे पुढील भाग पडतात .
१) अप्लिकेशन सॉफ्टवेर :-
अप्लिकेशन सॉफ्टवेर म्हणजे संगणका चा उपयोग करून घेताना त्या पासून रिजल्ट मिळू
शकतो असा सॉफ्टवेर . याला पेकेज (Packege ) ही म्हणतात . उदा .वर्ड ,
एक्सेल यात लेटर
फोर्मेटिंग , किवा अजुन खुप काही करण अशा सॉफ्टवेर मुळे शक्य होते .थोडक्यात संगणका कडून
एखाद्या ऑफिस चे काम डिजाईन करण्यासाठी अशी सॉफ्टवेर बनवून घेतली जातात .
२) डेवलेपमेंट सोफ्टवेर :-
डेवलेपमेंट सोफ्टवेर याला Languages सॉफ्टवेर म्हणतात . आपण या आधी पाहिले की अप्लिकेशन
सॉफ्टवेर म्हणजे संगणका चा उपयोग करून घेताना त्या पासून रिजल्ट मिलावी शकतो
परन्तु हे रिजल्ट देण्यासाठी काँम्प्यूटरला सागणारा ही कोणीतरी असतो . वेग वेग
वेगळ्या भाषेत संगणकाच्या वेगवेगळ्या भागाना समजेल अशी सूचना देण्याच काम
डेवलेपमेंट सोफ्टवेर करते . या मध्ये बेसिक ,कोबोल , सी , सी ++ विज्युअल बेसिक सॉफ्टवेर
येतात .
३) ऑपरेटिंग सिस्टम :-
संगणकाचा आणि काम करणार्या व्यक्तीचा संगणकाशी सुस्वाद व्हावा या साठी कोणत्या
तरी माध्यमाची गरज असते . हा सवाद प्रोग्राम्स च्या माध्यमातून साधला जातो त्या
प्रोग्रामला ऑपरेटिंग सिस्टम असे म्हणतात किवा OS देखिल म्हणतात . डॉस , यूनिक्स , विन्डोज़ , एप्पल सारख्या ऑपरेटिंग
सिस्टम आहेत .
इंटरनेट (Internet) :
सपर्क :-
शोपिंग (Shoping) :-
इंटरनेट च्या माध्यमातून तुम्ही शोपिंग करू शकता किवा एखादी वस्तु विकू ही
शकता . बाजारात आलेल्या नविन वस्तुंची माहिती नेट मुळे आपणास बघायला मीळते.
एलेक्ट्रोनिस्क कार्ड किवा डेबिट कार्ड वापरून तुम्ही ही खरेदी करू शकता .
सर्चिंग :-
मनोरंजन :-
या विषयावर सांगाव तेवढ कमी आहे कारण या विषयावर इंटरनेट वर भरपूर माहितींचा खजाना आहे . संगीत , चित्रपट , मासिक तसेच आता ऑनलाइन चित्रपट ही आपण नेटवर पाहू शकतो . सध्या ऑनलाइन गेम्स ही नेट वर उपलब्ध आहेत .
इंटरनेट कनेक्ट होण्यासाठी संगणक ब्राउजर्स असणे गरजेच असत . यात माइक्रोसॉफ्ट इंटरनेट हे खुप लोकप्रिय ब्राउजर्स आहेत . संगणकाच्या डेस्कटॉप आणि प्रोग्राम्स मध्ये हे ब्राउजर्स आहेत . वेबसाइट चे नाव किवा URL ( यूनीफोर्म रिसोर्स लोकेटर्स ) माहिती असणे गरजेच आहे . सगणका मधील डाटा ची देवाण घेवाण करण्यासाठी वापरत येणार्या नियमाना प्रोटोकॉल असे म्हणतात. http:// हा सर्वसाधारण वापरात येणारा प्रोटोकॉल आहे . तर .com (.कॉम) म्हणजे कोमुनिकेशन होय.
Comments
Post a Comment
If you have any doubts, pls let me know.